महाराष्ट्र शासनाने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी Building Workers Pension Scheme जाहीर केली असून, वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षिततेसाठी मोठा दिलासा दिला आहे. ही योजना 19 जून 2025 रोजी अधिकृतपणे मंजूर झाली आहे.
🔶 काय आहे ही पेन्शन योजना?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत व 60 वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना दरमहा निश्चित रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे.
घर मिळायचं होतं… पण नावच गायब केलं!
✅ शासन निर्णयाची ठळक वैशिष्ट्ये
📅 निर्णय दिनांक: 19 जून 2025
🖋️ अधिकृत स्वाक्षरी: सागुणा काळे-ठेंगील (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)
📜 कायद्याअंतर्गत अंमलबजावणी: इमारत व इतर बांधकाम कामगार (कल्याण) अधिनियम, 1996
🎯 योजनेचे फायदे – Building Workers Pension Scheme Benefits
🔹 दरमहा खात्रीशीर उत्पन्न
🔹 नोंदणी कालावधी प्रमाणे पेन्शन
🔹 पती-पत्नी दोघांनाही स्वतंत्र लाभ
🔹 कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार
💰 नोंदणी कालावधी आणि पेन्शन रक्कम:
📆 नोंदणीची वर्षे 💵 मासिक पेन्शन
10 वर्षे ₹6,000
15 वर्षे ₹9,000
20 वर्षे ₹12,000
📌 पात्रता निकष – कोण करू शकतो अर्ज?
🔸 वय किमान 60 वर्षे पूर्ण
🔸 सलग 10 वर्षांची नोंदणी आवश्यक
🔸 अर्जदार ESIC किंवा EPF चा लाभार्थी नसावा
📝 अर्ज प्रक्रिया कशी कराल?
1. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करा
🌐 https://mahabocw.in
2. अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे संलग्न करा
(उदा. – आधार कार्ड, नोंदणी पुरावे, फोटो इ.)
3. कामगार सुविधा केंद्रात प्रत्यक्ष अर्ज सादर करा
4. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर थेट बँक खात्यात पेन्शन जमा
📎 उपयुक्त माहिती आणि सेवा –
✔️ बांधकाम कामगार म्हणून नवीन नोंदणी / नुतनीकरण
✔️ कल्याणकारी योजना, शिक्षण/आरोग्य लाभ
✔️ अर्ज स्थिती ऑनलाइन तपासणी
✔️ जिल्ह्यानुसार कामगार केंद्र यादी